maharashtra

किसनवीर सहकारी साखर कारखाना निवडणुकीतुन स्वाभिमानाने स्वाभिमानीची माघार : राजु शेळके


Kisanveer Sahakari Sugar Factory withdraws from election with pride: Raju Shelke
अपेक्षित प्रतिसाद, सहकार्य, चांगला विश्वासू सहकारी गट मिळाला नसल्याने किसनवीर सहकारी साखर कारखाना निवडणुकीतुन स्वाभिमानाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माघार घेतली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजु शेळके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

सातारा : अपेक्षित प्रतिसाद, सहकार्य, चांगला विश्वासू सहकारी गट मिळाला नसल्याने किसनवीर सहकारी साखर कारखाना निवडणुकीतुन स्वाभिमानाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माघार घेतली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजु शेळके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, किसनवीर कारखान्याचे वाटोळे करणारी वाई तालुक्यातील दोन घराणी पुन्हा एकदा त्याच कारभाराची पुनरावृत्ती करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात आली. निवडणूक वगळता अनेक वर्षे ह्यांना ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्नांशी काहीही घेणं देणं नसतं. दुर्दैवाने ह्या घटकांनी ज्यांनी आळीपाळीने कारखाना, सभासद देशोधडीला लावला त्यांना पर्याय म्हणून आम्ही शेवटपर्यंत शेतकरी, सभासद, कामगार, भुमीपुत्र या भागातील व्यापार उद्योग वाचवण्यासाठी किसनवीर कारखाना शेतकरी बचाव पँनेल च्या माध्यमातून एक चांगला सक्षम तिसरा पर्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला.पण आम्हाला अपेक्षित प्रतिसाद, सहकार्य, चांगला विश्वासू सहकारी गट मिळाला नाही. याचाच अर्थ कि निवडणूक व्यवस्थेतील भांडवलशाहीने मतदारराजा समोरील रास्त पर्याय सुद्धा येऊ न देता, राजकीय दुकानदारी निर्माण करणारे पर्याय अशी अप्रत्यक्ष लाचारी निर्माण केली आहे.
परंतू शेतकरी हितासाठी संघटना यापूर्वीही भांडत होती आणि पुढेही ताकतीने भांडत राहील. स्वाभिमानीने या अगोदर अनेक वेळा संघर्ष करुन शेतकर्‍यांच्या हक्कांचे  करोडो रुपये वसुल करुन दिले आहेत हे सर्वश्रुत आहे. इथुन पुढेही शेतकरी हितासाठी कोणा बरोबरही संघर्ष करत राहील. सत्ताधार्‍यांना जाब विचारत राहील. किसनवीर कारखान्याची मागील गळीत हंगामातील 55 कोटी थकीत ऊसबीले जर येत्या चार दिवसात शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झाली नाहीत तर ऐन निवडणुकीत स्वाभिमानी आंदोलन सुरु करेल, याची नोंद घ्यावी. त्यामुळे तातडीने शेतकर्‍यांचे थकीत ऊस बिल जमा करावे, हा आमचा इशारा आहे.
आताचे सर्वच गट शेवटच्या क्षणापर्यंत आमच्या सोबत हातमिळवणी करुन उमेदवारी देण्यास तयार झाले असते परंतु या सर्वांनी येथील शेतकरी गेली अनेक दिवस  ऊस,ऊस,बिल,बिल असा आक्रोश करत होता तेव्हा आताच्या सारख्या तडजोडी करुन कोणीही नेता,संचालक, गाव पुढारी, लोकप्रतिनिधी शेतकर्‍यांच्या बाजून अथवा पगार न मिळालेल्या कामगारांच्या बाजूने भांडायला रस्त्यावर आला नाही का कोणता मोर्चा अथवा आंदोलन केले नाही. असे  असल्याने आम्ही कोणा बरोबर ही हातमिळवणी न करता निवडणुकीतून माघार घेतलेली आहे आम्ही अनेक दिवस एक चांगला तिसरा सशक्त पर्याय सर्व कर्ज फेडून स्वबळावर कारखाना चालवून शेतकर्‍यांना, सभासदांना, कामगारांना न्याय देऊन परत या पाच तालुक्यातील जनतेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शेवट पर्यंत प्रयत्न केले. परंतु यश आले नाही जे ते आप आपला फायदा स्वार्थ शोधत राहिल्याने व आम्ही आमच्या तत्वावर ठाम राहून चुकीच्या गटाबरोबर गेलो नाही. स्वाभिमानी नम्रपणे सर्व सभासद शेतकरी बंधुंना जाहीर आवाहन करत आहे.आपण सुज्ञ आहात.किसनवीर आबांच्या या सहकारी साखर कारखाना मंदिराच्या चाव्या कोणाकडे द्यायच्या त्यांचे हात स्वच्छ आहेत का ? एकाने घोटाळे केले तर दुसरा वाटोळे करुन कारखाना दुसर्‍या च्या घशात घालून किसनवीर चा जरडेंश्वर करु नये म्हणजे झाले. याचा  विचार आपणच योग्यपणे करावा. आमचा पाठिंबा कोणत्याही पॅनलला नाही. किसनवीर कारखाना अघोषित घराणेशाहीचा बळी ठरणार ह्याचं मात्र कायम दुःख राहील.