मालट्रक चालकाने कच्चे लोखंड आणि रोख रकमेच्या अपहार केला. ५ टन कच्चे लोखंड व ४५ हजाराची रोख रकमेचा अपहार केल्याने ट्रक मालकाने कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मालट्रक चालकाला अटक केली आहे.
कराड : मालट्रक चालकाने कच्चे लोखंड आणि रोख रकमेच्या अपहार केला. ५ टन कच्चे लोखंड व ४५ हजाराची रोख रकमेचा अपहार केल्याने ट्रक मालकाने कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मालट्रक चालकाला अटक केली आहे. हेमंतकुमार ज्ञानदेव जगताप रा. कोथळे, ता. पुरंदर, जि. पुणे यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रकचालक नवनाथ केरनाथ चव्हाण (वय ४०) रा. वडगाव, ता. मावळ याला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कोथळे येथील हेमंतकुमार जगताप यांच्या मालकीच्या ट्रकवर (क्र.एमएच १२ एमव्ही १८८०) वडगावमधील नवनाथ चव्हाण हा एक महिन्यापासून चालक म्हणून कामास होता. २३ डिसेंबर रोजी नवनाथ हा पुण्यातून ट्रकमधून माल घेऊन गोव्याला गेला होता. त्याठिकाणी त्याला मालाचे ४२ हजार रुपये मिळाले होते. ते पैसे त्याने ट्रकमालक हेमंतकुमार जगताप यांना देणे अपेक्षित होते. तसेच गोव्याहून परतताना ट्रकमध्ये ५ टन कच्चे लोखंड भरण्यात आले होते.
नवनाथ ट्रक घेऊन परतला त्यावेळी लोखंडाचा माल आणि गोव्यात मिळालेले मालाचे पैसेही त्याने ट्रक मालकांपर्यंत पोहोचविले नाहीत. गोवा ते कराड येथील कोल्हापूर नाक्यादरम्यान त्याने त्या मालाचा आणि पैशाचा असा एकुण १ लाख ६७ हजार रुपयाचा अपहार केला असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ट्रकमालक हेमंतकुमार जगताप यांनी याबाबत कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर अधिक तपास करीत आहेत.


