maharashtra

निढळ येथे अंगणवाडीच्या चिमुकल्यांची दिंडी उत्साहात


Anganwadi Chimukalyanchi Dindi in excitement at Nidhal
निढळ, ता. खटाव येथील सर्व अंगणवाडी विद्यार्थी यांची निढळ गावातून दिंडी काढण्यात आली. यावेळी चिमुकली पालखी तयार करणेत आली होती. चिमुकल्यानी वारकरी वेष धारण केला होता. ज्ञानोबा माऊली तुकाराम चा गजर करत व पुढे  भगव्या पताका घेऊन हे छोटे वारकरी अत्यंत उत्साहात दिसून येत होते.

पुसेगाव : निढळ, ता. खटाव येथील सर्व अंगणवाडी विद्यार्थी यांची निढळ गावातून दिंडी काढण्यात आली. यावेळी चिमुकली पालखी तयार करणेत आली होती. चिमुकल्यानी वारकरी वेष धारण केला होता. ज्ञानोबा माऊली तुकाराम चा गजर करत व पुढे  भगव्या पताका घेऊन हे छोटे वारकरी अत्यंत उत्साहात दिसून येत होते. या छोट्या वारकऱ्यांचे गावातील चौका चौकात स्वागत करणेत आले व त्याना खाऊ देण्यात आला. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी अत्यंत सुंदर केले.
आम्ही आमच्या अंगणवाडीमध्ये दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतो. त्यामुळे या चिमुकल्यावर उत्तम संस्कार होतात. पालकवर्ग सुद्धा अशा कार्यक्रमासाठी उत्साही असतात. आमच्या सरकारी अंगणवाडी शाळा ही इंग्रजी मिडीयम किंवा शहरी शाळा पेक्षा कुठेही कमी नाही, असे येथील अंगणवाडी सेविका वर्गाने सांगितले.