अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकाविरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे.
सातारा : अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकाविरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 12 डिसेंबर रोजी 2 वाजण्याच्या सुमारास आरटीओ ऑफिस विजयनगर कराड येथील परिसरात तेथीलच दिवान यशवंत नलवडे वय 28 हा पत्र्याच्या शेडच्या आडोशाला अंधाराचा फायदा घेऊन लपलेल्या स्थितीत आढळून आला. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


