maharashtra

विकासकामांच्या माध्यमातूनच खा. रणजितसिहांनी विरोधकांना केले चितपट : अमोल सस्ते


रणजितदादांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, मला टीका टिप्पणी करण्यात वेळ घालवायचा नाही, मला फलटण तालुक्याचा विकास करायचा आहे, असे सांगून विरोधकांना चितपट केले व त्यांच्या या शब्दाने तालुक्यातील जनतेची मने जिंकली आहेत.

फलटण : सातारा लोकसभा मतदारसंघ असताना व आत्ता माढा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेला फलटण तालुका, फलटण म्हटले की राजकीय वलय असलेला व सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारा तालुका म्हणून संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्रात ओळखला जात होता. मात्र सध्या तो ओळखला जातोय तो माढा लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या दैदिप्यमान कामाने. त्यातच रणजितदादांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, मला टीका टिप्पणी करण्यात वेळ घालवायचा नाही, मला फलटण तालुक्याचा विकास करायचा आहे, असे सांगून विरोधकांना चितपट केले व त्यांच्या या शब्दाने तालुक्यातील जनतेची मने जिंकली आहेत.
गत दोन वर्षांपूर्वी कोविड-19 मूळे अनेक विकासकामे करताना मर्यादा आल्या होत्या. त्याचे कारण म्हणजे लोकांचे जीव वाचवण्यासाठी केंद्रातून निधी पाहिजे, एवढा उपलब्ध होत नव्हता. तसेच राज्यात भाजपचे सरकार नसल्याने निधी दिला जात नव्हता आणि आता केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असून शेतीला पाणी, आरोग्यसेवा, रस्ते, रेल्वे, एमआयडीसी व इतर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ते अहोरात्र झटत असून त्यांच्या कामाने फलटण तालुक्यातील जनतेला नवीन आशेचा किरण दिसत असून दादा आता तुम्ही फक्त हाक द्या आम्ही तुम्हाला साथ देऊ, असे बोलून दाखवीत आहे.
धरण उशाला आणि कोरड घशाला, जमिनी फलटण तालुक्यातील शेतकर्‍यांच्या, पुनर्वसन फलटण तालुक्यात, निधी सातारा जिल्ह्याचा आणि ते पाणी मात्र इतरांना अशी अवस्था झाली होती. कालवे पूर्ण होऊ नयेत म्हणून राजकीय व शासकीय कागदी घोडे नाचवून फलटणच्या जनतेला व शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम तब्बल 20-25 वर्षे सातत्याने सुरू होते. काही काळ अपवाद वगळता फलटण च्या जनतेला तोंड दाबून बुक्क्यांचा मार खावा लागला होता. मात्र ना.देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री होताच खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची माढा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील शेतकर्‍यांची शेतीच्या पाण्यासाठी वणवण पहावी वाटत नव्हती, आणि दादा नेहमीच राज्य सरकारच्या माध्यमातून पाठपुरावा करीत होते. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आणि नीरा देवघर प्रकल्पाला सुधारित मान्यता मिळून 3200 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होईल, असे सातारा जिल्हा सुपुत्र मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी सांगत खासदारांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण केली.
मग खासदारांनी युवकांना नोकरी मिळाली पाहिजे, यासाठी जुनीच मागणी असलेल्या नाईकबोमवाडी एमआयडीसी चे स्वप्न सत्यात उतरवले आणि त्या मध्ये तब्बल वीसहून अधिक मल्टिनॅशनल कंपनी त्यामध्ये येणार असून फलटण तालुक्यातील तब्बल 4 हजार हुन अधिक मुलांना त्यामध्ये नोकर्‍या मिळणार आहेत. तसेच आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ग्रामीण भागातील व शहरी भागातील लोकांसाठी रुग्णालय असणं गरजेचं होतं. म्हणून राज्य शासनाकडे पाठपुरावा करून 65 कोटी रुपये मंजूर करून घेतले व लवकरच त्याचा आराखडा होऊन कामाला सुरुवात होईल. आळंदी -पंढरपूर महामार्ग मंजूर झाल्यामुळे अनेक वारकरी या रोडने पंढरपूर कडे जात असतात. या वारकर्‍यांसाठी फलटण तालुक्यामध्ये दोन वारकरी भवन मंजूर झाले असुन लवकरच कामाला सुरुवात होईल, अशी माहिती भाजप तालुका अध्यक्ष बजरंग गावडे व शहराध्यक्ष अमोल सस्ते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.