रणजितदादांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, मला टीका टिप्पणी करण्यात वेळ घालवायचा नाही, मला फलटण तालुक्याचा विकास करायचा आहे, असे सांगून विरोधकांना चितपट केले व त्यांच्या या शब्दाने तालुक्यातील जनतेची मने जिंकली आहेत.
सातारा शहरातील तब्बल 16 कामांसाठी वेगवेगळ्या योजनांमधून 10 कोटी 57 लाख 24 हजार 193 रुपये निधी मंजूर झाला आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई व जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या माध्यमातून हा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
माढा मतदारसंघात ज्यांच्या कार्यकाळात झाली नाहीत ती कामे थोड्या अवधीतच पूर्णत्वास गेल्याने मिस्टर रामराजेंच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. त्यामुळेच ते काहीही वक्तव्ये करीत असल्याचे सांगत खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सातारा येथे मिस्टर रामराजेंची उरली सुरलीही काढली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामांना वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंजुरी दिली असून खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे ही कामे मंजूर झाल्याचे युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष संग्राम बर्गे यांनी सांगितले.
सातारा शहरांमध्ये तब्बल साडेपाचशे कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तब्बल 48 कोटी रुपयांच्या विकास कामांना नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे, अशी स्पष्ट माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
दि. ३० सप्टेंबर रोजी सप्टेंबर रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीमध्ये नियोजन समितीमार्फत उपलब्ध असलेल्या निधीतून पुढील सहा महिन्यात जिल्ह्यातील विकास कामे मार्गी लावण्यावर आपला भर राहील, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज सातारा येथे पत्रकार परिषदेत दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेळा दिल्ली दौरा केला. महाराष्ट्रात जे सत्तांतर झाले आणि विकास कामांची जी आव्हाने आहेत. त्याकरिता त्यांनी नीती आयोगाकडे प्राधान्य क्रमाने करावयाच्या कामांसाठी अठरा हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे.
सातारा पालिकेत सत्ता असो वा नसो, सातारकरांच्या समस्या सोडवण्यासाठी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. सातारा शहरात सातत्याने असंख्य विकासकामे मार्गी लावणाऱ्या आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा शहर आणि हद्दवाढीत समाविष्ट शाहूपुरी, शाहूनगर, गोळीबार आदी भागातील १३ विकासकामे मार्गी लावण्यासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमातून १ कोटी ६ हजार ८८ रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून कराड तालुक्यातील विविध विकासकांमासाठी 2 कोटी 79 लाख रूपायांचा निधी मंजूर झाला आहे. जनसुविधा, नागरी सुविधा, 5054, 3054, इतर जिल्हा मार्ग विकास व मजबुतीकरण योजना तसेच ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ अशा योजनेतून मंजूर झालेल्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळून निधी उपलब्ध झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
गजानन हाऊसिंग सोसायटी (कराड) येथे जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांच्या माध्यमातून व प्रयत्नातुन मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ नुकताच संपन्न झाला. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर व भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.