सातारा येथे दोघांना मारहाण करून त्यांच्याकडून रोख रक्कम व चांदीचे ब्रेसलेट असा एकूण 4 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी 10 ते 11 जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात सशस्त्र दरोड्याचा गुन्हा गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : सातारा येथे दोघांना मारहाण करून त्यांच्याकडून रोख रक्कम व चांदीचे ब्रेसलेट असा एकूण 4 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी 10 ते 11 जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात सशस्त्र दरोड्याचा गुन्हा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी 3.30 ते दि. 4.30 वाजण्याच्या सुमारास सातारा येथील शुक्रवार पेठ व गेंडामाळ परिसर येथे तेथीलच साहिल रणदिवे, गजानन जाधव, रा. प्रतापसिंहनगर, सातारा, पोपट भैया उर्फ अर्जुन, शुभम दानवे दोघेही रा. गेंडामाळ, शाहूपुरी, सातारा आणि शिवम निकम रा. गोडोली, ता. सातारा यांच्यासह 5 ते 6 अनोळखी युवकांनी म्हणजेच 10 ते 11 जणांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून सिद्दीक इम्तियाज बागवान, रा. बुधवार पेठ, सातारा आणि यश सूर्यवंशी ( पूर्ण नाव व पत्ता समजू शकला नाही) या दोघांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवून घेऊन गेले. त्या ठिकाणी गजानन जाधव याने बागवान याला पट्टयाने मारहाण केली. तर साहिल रणदिवे याने शिवीगाळ करत त्याच्या खिशातील दीड हजार रुपये काढून घेतले. यश सूर्यवंशी याचे 3 हजार रुपये किमतीचे चांदीचे ब्रेसलेट काढून घेऊन यश सूर्यवंशी याच्यावर कोयत्याने वार केल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


