सातारा : चिखली, ता. कराड गावच्या हद्दीत बेरडकी नावाच्या शिवारात दत्तात्रय उर्फ दादासो वामन जाधव यांच्या मालकीच्या असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये राकेश उदयसिंह जगदाळे वय 44 राहणार मसूर तालुका कराड, सोमनाथ भिकू रुपनर वय 37 राहणार मसूर ता कराड, रामचंद्र संतु पवार वय 62 राहणार चिखली तालुका कराड, जालिंदर गणपती जाधव राहणार मसूर ता कराड, राजेंद्र शिवाजी निकम राहणार मसूर ता कराड, गणेश जालिंदर जगताप वय 40 राहणार माळवाडी तालुका कराड, वसंत बजरंग माळी राहणार चिखली तालुका कराड, राहुल मोहन सावंत राहणार चिखली तालुका कराड, अंबादास दगडू वाघमारे राहणार चिखली तालुका कराड, दत्तात्रय उर्फ दादासो वामन जाधव राहणार चिखली तालुका कराड हे पैशावर जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून एक लाख चार हजार सातशे रुपये आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. ही कारवाई उंब्रज पोलिसांनी केली आहे.
दुसऱ्या घटनेत मेढा तास जावली गावच्या हद्दीत वेण्णा चौक येथील हॉटेल माहुरे जवळील पत्र्याच्या शेडचे आडोशास भूषण नथू कांबळे राहणार मेढा ता. जावली हा जुगार घेताना आढळून आला. त्याच्याकडून 582 रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.


