maharashtra

संगमनगर येथून ७५ हजार रुपये किमतीच्या दागिन्यांची चोरी


Theft of jewelery worth Rs 75,000 from Sangamnagar
संगमनगर, (खेड) ता. सातारा येथील एका अपार्टमेंटमध्ये असणाऱ्या फ्लॅटमधून एका दाम्पत्याने ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : संगमनगर, (खेड) ता. सातारा येथील एका अपार्टमेंटमध्ये असणाऱ्या फ्लॅटमधून एका दाम्पत्याने ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ७ ते १२ फेब्रुवारी दरम्यान संगमनगर, (खेड) ता. सातारा येथील विजय रेसिडेन्सी या अपार्टमेंटमधील एका फ्लॅटच्या बेडरूममधून उज्वला संदीप खराडे आणि संदीप खराडे दोघेही रा. भोसरी, पुणे या दाम्पत्याने ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची तक्रार प्रताप राजाराम जगताप यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी दाम्पत्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.