deshvidesh

नवरा मेळा तरी चालेल पण सवत विधवा झाली पाहिजे : जेलस्की 

युक्रेन राष्ट्रपती जेलस्की यांचे वागणेबोलणेच अर्थ 

Even if her husband dies, she will be able to become a widow: Zelensky
युक्रेन - रशिया युद्धात गेल्या २० दिवसामध्ये युक्रेन मधील मोठमोठी शहरे उध्वस्त होऊन त्यांचे रूपांतर खंडरमध्ये झाले आहे. जेलस्की यांचे नाटो व युरोपिअन युनियन मध्ये युक्रेनचा समावेशाच्या स्वप्नामुळे संपूर्ण देश नष्ट होईला लागला आहे. युक्रेन चे राष्ट्राध्यक्ष जेलस्की याना या युद्धाचा अंत माहित असून युक्रेन यामध्ये हरणार आणि रशिया युक्रेन वर ताबा घेणार परंतु शरणागती पत्करून खुशीहाल देश रशियाचे ताब्यात देण्यापेक्षा संपूर्ण बेचिराग झालेला देश देऊन नवरा मेळा तरी चालेल पण सवत विधवा झाली पाहिजे असे वर्तवणूक करीत आहेत.

           गेली २० दिवस युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरु आहे. यापूर्वी युद्ध आणि त्याचीकारणे  यावर साहसवार्ता ने भाष्य केलेच होते. बलाढ्य रशियाचे तुलनेत नगण्य असलेल्या युक्रेन ने  विनाश काळे विपरीत बुद्धी प्रमाणे युरोपिअन युनियन आणि अमेरिकेच्या पोकळ आश्वासनांचे जोरावर रशियासारख्या बलाढ्य देशाशी वैर घेतले याचे परिणाम जगापुढे यायला सुरुवात झाली असून युरोपियन युनियन आणि अमेरिका नाटो मध्ये सामावून घेणार नाही किंवा सैन्य मदत पण करणार नाही हे पहिले ४ दिवसात बहुतांशी सुस्पष्ट झाले होते परंतु मराठी महान नवरा मेळा तरी चालेल पण सवत विधवा झाली पाहिजे या प्रमाणे संपूर्ण युक्रेन नष्ट झाले तरी चालेल पण पोकळ राष्ट्वावाद संपला नाही पाहिजे याप्रमाणे जेलस्की रोज नवीन विधान करत आहेत. वेळोवेळी पाश्चिमात्य मीडिया युक्रेन चा पराक्रमाचे नवनवीन व्हिडीओ जगापुढे पाठवत आहे परंतु जमिनीवरची परिस्थिती वेगळी असलेचे आता दिसून यायला लागले आहे. जगापुढे व्यवहारात न बसणारी आकडेवारी दाखवून युक्रेन जगाला नाही तर स्वतःलाच फसवत असलेच चित्र बहुतांसी दिसून यायला लागले आहे. रशिया रोज शेकडो क्षेपणात्रांचा मारा युक्रेन वर करीत असून त्यात मोठ्या प्रमाणात युक्रेनची राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होत आहे त्यासमोर प्रतिउत्तरात युक्रेन कडून होणारे नुकसान अल्प आहे.

                अमेरिकन सुरक्षायंत्रणेने आज जरी केलेल्या अहवालानुसार हे युद्ध जास्तीत जास्त १५ ते २० दिवस चालेल असे सांगून त्याचे कारण रशियाकडेल दारुगोळा संपेल आणि रशियन सैन्य दमून जाईल हे असेल असे भाकीत केले आहे. वास्तवात रशिया जगातील दुसऱ्या क्रमांकाची सेना व अणुबॉम्ब आकडेवारी मध्ये जगातील पहिल्या क्रमांकाचा देश आहे. त्याचबरोबर रशियाडे असणाऱ्या हायपरसॉनिक, सुपरसिनिक मिसाईल यंत्रणा फक्त आणि फक्त रशियाकडेच आहेत. अशा प्रकारचे तंत्रज्ञान महासत्ता अमेरिकेकडे पण नाहीत याची जाणीव अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन याना असलेमुळे निर्बंधासारखे टाकलंतू उपाययोजना अवलंबत अमेरिका या युद्धामध्ये प्रत्यक्ष सहभागापासून लांब राहायचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेशी दोन हात करायची हिम्मत तसेच सामर्थ्य फक्त रशियाकडे आहे. रशिया - युक्रेन युद्धाचा अभ्यास केला असता इराण - रशिया मैत्री, सौदी अरब ने कच्या तेलाचे चीन बरोबरचे व्यवहार युवान म्हणजे चिनी चलनात करण्याचा निर्णय, चीन चा थेट अमेरिकेवर केलेलं आरोप  तसेच भारताची तठस्थ भूमिका यातून नवीन समीकरणे निर्माण होऊन युरोपिन युनियन प्रमाणे अशियन युनियन निर्मान होऊन जगात नवीन महासत्ता निर्माण होण्यासारखी लक्षणे दिसू लागली आहेत. प्रथमदर्शनी  रशिया-युक्रेन यांचे नुकसान दिसत असले तरी अमेरिकेचे महासत्ता पदाचा मुकून यातून डगमगताना दिसायला लागला आहे.