मालदेववाडी, ता. वाई येथील बंद घरात घरफोडी करून अज्ञात चोरट्याने ६२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : मालदेववाडी, ता. वाई येथील बंद घरात घरफोडी करून अज्ञात चोरट्याने ६२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ३ जून रोजी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास महादेव वाडी येथील एका बंद घराची कडी काढून आत प्रवेश करून अज्ञात चोरट्याने विठ्ठल लक्ष्मण मोरे, वय ७५ यांच्या पत्नीने उशाखाली ठेवलेले ४० हजार रुपये रोख, १ हजार २०० रुपये किमतीची कानातील सोन्याची कर्णफुले असा एकूण ६२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झाले आहे.


