बेदरकारपणे रिक्षा चालवल्या प्रकरणी रिक्षा चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : बेदरकारपणे रिक्षा चालवल्या प्रकरणी रिक्षा चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 19 रोजी सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास पोवई नाका ते पोलीस मुख्यालय जाणाऱ्या रस्त्यावर सर्जन अँथनी डिसोजा रा. सदर बाजार, सातारा याने त्याच्या ताब्यातील रिक्षा क्र. एमएच 11 एजी 1823 वेडीवाकडी, भरधाव वेगात चालवल्याचे दिसून आले. याप्रकरणी डिसोजावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार मोहिते करीत आहेत.


