श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल येथे मोठ्या उत्साहात शाळा प्रवेश दिन संपन्न झाला. यादरम्यान समता सैनिक दालाच्या वतीने बिगूल वाजवून मानवंदनाही देण्यात आली.
सातारा : डॉ, बाबासहेब आंबेडकर म्हणजे संघर्ष. संघर्षातून विद्यार्थ्याचा हा महामानव झाला आणि त्यांनी हा भारत देश घडविला. नव्या पिढ्यांसाठी, नवभारतासाठी हा महामानव प्रेरणेचा ऊर्जास्त्रोत आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन तथा विद्यार्थी मोठ्या उत्साहाने साजरा करायला हवा, असे विचार विद्यार्थी दिवस सोहळ्याच्या कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केले.
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल येथे मोठ्या उत्साहात शाळा प्रवेश दिन संपन्न झाला. यादरम्यान समता सैनिक दालाच्या वतीने बिगूल वाजवून मानवंदनाही देण्यात आली. या कार्यक्रमात सहाय्यक समाजकल्याण आयुक्त नितीन ऊबाळे, प्रा. केशव पवार, विद्यार्थी दिवसाचे प्रवर्तक अरुण जावळे, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, जातपडताळणी विभागाच्या उपायुक्त स्वाती इथापे, समता सैनिक दलाचे प्रमुख अरुण पोळ, भंते दीपंकर, प्रविण धस्के अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
अरुण पोळ आपल्या भाषणात म्हणाले म्हाणाले कि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा एक प्रेणास्त्रोत असून भारतीय समाजाने आणि सबंध विद्यार्थी वर्गाने त्यांपासून प्रेरणा घेऊन वाटचाल केली पाहीजे. पत्रकार अरुण जावळे हे गेली १६ -१७ वर्षे या दिवसाचे महत्व विषद करत आहेत, त्यामुळे हा विद्यार्थी देशपातळीवर लवकर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
डॉ, बाबासाहेब आंबेडकरांचे विचारकार्य पुढे घेऊन जाण्यासाठी आपणास जेवढे शक्य होईल तेवढा प्रयत्न आपण केला पाहिजे असे सांगत प्रा केशव पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट उपस्थितांसमोर उलगडला. समाजकल्याण आयुक्त नितीन ऊबाळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महत्व विषद करत शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी दिवसाचे प्रवर्तक अरुण जावळे यांनी विद्यार्थी दिवसाच्या पाठीमागची पार्श्वभूमी सांगत विद्यार्थी दिवस देशभर साजरा व्हावा यासाठी राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना पत्र पाठविण्याची मोहीम सुरू असल्याचे स्पष्ट केले. केंद्र स्तरावर सुरु असलेला पाठपुराव्यामुळे कोणत्याही क्षणी अधिसूचना निघेल असा विश्वासही व्यक्त केला. शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, मुख्याध्यापक सन्मति देशमाने यांनी हायस्कूलच्या संदर्भाने भूमिका मांडली. प्रविण धस्के यांचेही भाषण झाले.
दरम्यान सकाळी दहा वाजता अरुण पोळ यांच्या नेतृत्वाखाली समता सैनिकदलाचे संचलन झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास विद्यार्थी दिवसाचे प्रवर्तक अरुण जावळे यांच्या हस्ते पुष्हार अर्पण करून संचलनास प्रारंभ झाला. त्यानंतर श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल येथे बिगूल वाजवून मानवंदना झाली. एक वही एक पेन या अभियानालाही उदंड प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमास आकाश कांबळे, यशपाल बनसोडे, योगेश म्हस्के, किरण कांबळे, विलासराव कांबळे, अजित जगताप, विजय मांडके, रमेश रत्नाकर आदी मान्यवरांसह शिक्षण आणि सामाजिक न्याय विभागातील अधिकारी तसेच महाराष्ट्राच्या नागपूर, मुंबई, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी अशा भागातून असंख्य आंबेडकर अनुयायी उपस्थित राहिले होते. विविध शाळांचे विद्यार्थी विद्यार्थीनी यांचाही सहभाग दखलपात्र होता. सुत्रसंचालन जयमाला चव्हाण यांनी केले, अस्मिता कदम, राजेंद्र कांबळे यांनी आभार मानले. यादरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांंचा सत्कारही झाला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न घेतले.


