पिरवाडी, (खेड) ता. सातारा येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या सेफ्टी दरवाजाचे कुलूप तोडून ७४ हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : पिरवाडी, (खेड) ता. सातारा येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या सेफ्टी दरवाजाचे कुलूप तोडून ७४ हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.२३ जुन रोजी १० ते दि. २५ जुन रोजी २ वाजण्याच्या दरम्यान पिरवाडी, (खेड) ता. सातारा येथील महालक्ष्मी नगरमध्ये असणाऱ्या विमल होम बी-१८, या बंद घराच्या सेफ्टी दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून बेडरूममधील लाकडी कपाटात ठेवलेले ७४ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची तक्रार भाग्यश्री विठ्ठल कदम, वय ३२ यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.


