फलटण येथील जुगार अड्ड्यावर छापा मारत पोलिसांनी सात जणांवर गुन्हा नोंद केला आहे. त्यांच्याकडून एकूण 3 लाख 18 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सातारा : फलटण येथील जुगार अड्ड्यावर छापा मारत पोलिसांनी सात जणांवर गुन्हा नोंद केला आहे. त्यांच्याकडून एकूण 3 लाख 18 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवार पेठ फलटण येथील खंडोबा मंदिराजवळ जुगार खेळताना विकी रामभाऊ बोके, अजय यशवंत ढावरे (दोघेही राहणार मंगळवार पेठ फलटण), प्रकाश किसन काकडे राहणार सांगवी तालुका फलटण, समीर जमशेद मुलानी राहणार पिंप्रद तालुका फलटण, अक्षय किशोर वाघमारे, रोहन साजन काकडे, राहुल सुरेश काकडे (तिघेही राहणार मंगळवार पेठ फलटण) आढळून आले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, एक मोबाईल, दोन मोटरसायकल असा एकूण 3 लाख 18 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.


