सातारा तालुका पोलिसांनी वडूथ गावच्या हद्दीतील एका जुगार अड्ड्यावर छापा मारून एकावर कारवाई केली आहे.
फलटण येथील जुगार अड्ड्यावर छापा मारत पोलिसांनी सात जणांवर गुन्हा नोंद केला आहे. त्यांच्याकडून एकूण 3 लाख 18 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
मटका बुकी शमीम सलीम शेख उर्फ समीर कच्छी या मटकाकिंगच्या सातार्यातील घरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (एलसीबी) धाड टाकून त्याच्यासह 20 जणांची उचलबांगडी केली.
कुडाळ, तालुका जावळी येथील स्वामी मंगल कार्यालयाच्या समोर उघड्या जागेमध्ये जुगार अड्डा चालवणाऱ्या सात जणांवर मेढा पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 प्रमाणे तक्रारीची नोंद करण्यात आली आहे.
सातारा बस स्थानकात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून दोघांवर कारवाई केली आहे.
कोरेगाव तालुक्यातील एका गावात सुरू असणार्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
नागेवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी ४६० रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
भूविकास बँकेशेजारी सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली आहे.
सातारा येथील भूविकास बँक चौकात एका टपरीच्या आडोशाला सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकला.
सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात एका पत्र्याच्या शेडच्या आडोशाला सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर सातारा शहर पोलिसांनी छापा मारला. या कारवाईत २ हजार ९८0 रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.