आकले, ता. सातारा येथे जमिनीच्या दाव्याच्या वादातून दोन गटात मारहाण झाल्याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
सातारा : आकले, ता. सातारा येथे जमिनीच्या दाव्याच्या वादातून दोन गटात मारहाण झाल्याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी सचिन दशरथ घागरे, वय २५, रा. आकले, ता. सातारा त्यांच्या वडिलांचा व चुलते संजय सिताराम घागरे यांचा जमिनीच्या कारणावरून सुरु असलेला दाव्याचा राग मनात धरून त्यांना संजय सिताराम घागरे, संजय सुभाष घागरे, निलेश संजय घागरे, निर्मला संजय घागरे यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
सुभाष संजय घागरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, दि. २३ रोजी ८.४५ वाजण्याच्या सुमारास धाकले येथे मीना दशरथ घागरे, सचिन दशरथ घागरे, प्रियंका दशरथ घागरे यांनी त्यांना धक्काबुक्की करून केली. पोलिसांनी दोन्हीही परस्परविरोधी तक्रारी दाखल करून घेतल्या आहेत.


