बनवडी, ता. कराड येथे चोरटी दारु विकणाऱ्यास पोलिसांनी अटक केले. मंगळवारी 8 रोजी दुपारी चोरट्या दारु विक्री विरोधात विशेष मोहीमेतंर्गत ही कारवाई झाली. त्यामध्ये १५ हजार रुपयांची देशी दारु जप्त करण्यात आली आहे.
कराड : बनवडी, ता. कराड येथे चोरटी दारु विकणाऱ्यास पोलिसांनी अटक केले. मंगळवारी 8 रोजी दुपारी चोरट्या दारु विक्री विरोधात विशेष मोहीमेतंर्गत ही कारवाई झाली. त्यामध्ये १५ हजार रुपयांची देशी दारु जप्त करण्यात आली आहे.
जीवन शिवाजी खवळे (वय ३७) रा. बनबडी ता. कराड असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संबधिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बनवडी येथे जीवन खवळे त्याच्या घराचे पाठीमागे मोकळ्या जागेत अवैध देशी दारुची चोरटी विक्री करत होता. त्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकासह तेथे जावून छापा टाकला. त्यावेळी खवले तेथून पळून जाण्याच्या बेतात होता. त्याला पोलिसांनी शिताफीने पकडले. या छाप्यात पोलिसांनी त्याच्याकडून १५ हजार रुपयांची देशी दारु जप्त केली आहे. याप्रकरणी हवालदार सचिन सुर्यवंशी यांनी पंचनामा केला असून तेच अधिक तपास करीत आहेत.


