घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी नाना तुकाराम साळुंखे (वय 37, रा. जिंती, ता. फलटण) याला दुसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस.आर. सालकुटे यांनी सहा महिन्यांची साधी कैद आणि 500 रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली.
सातारा : घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी नाना तुकाराम साळुंखे (वय 37, रा. जिंती, ता. फलटण) याला दुसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस.आर. सालकुटे यांनी सहा महिन्यांची साधी कैद आणि 500 रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी, पीडित विवाहिता घरात एकटी असताना नाना साळुंखे हा तिच्या घरात गेला. तिचा हात धरून तू मला आवडतेस,’ असे म्हणून तिचा विनयभंग केला. ही घटना 10 मार्च 2019 रोजी फलटण तालुक्यात घडली होती. यावरुन गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक डॉ. अभिजित पाटील यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने चार साक्षीदार तपासले. सुनावणीवेळी न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून आरोपीला सहा महिन्यांची साधी कैदची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे ऍड. फिरोज शेख यांनी काम पाहिले.


