शाहूपुरी येथील बिल्डर रोहन बाळासाहेब वाघमारेवर १ कोटी ७५ लाख रुपयांचा एसबीआय बँकेला फसवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शाहूपुरी पोलिसांच्या पथकाने त्याला मंगळवार पेठ चौकीत चौकशीसाठी बोलवले होते. दरम्यान, पोलीस त्याच्याकडील कागदपत्रांची पाहणी करत असतानाच वाघमारे अटकेच्या भितीने तेथून पळुन निघाला होता. त्यावेळी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करणारे पोलीस उपनिरीक्षक बशीर मुलाणी यांच्या अंगावर कार घालून रोहन पसार झाला.
सातारा : शाहूपुरी येथील बिल्डर रोहन बाळासाहेब वाघमारेवर १ कोटी ७५ लाख रुपयांचा एसबीआय बँकेला फसवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शाहूपुरी पोलिसांच्या पथकाने त्याला मंगळवार पेठ चौकीत चौकशीसाठी बोलवले होते. दरम्यान, पोलीस त्याच्याकडील कागदपत्रांची पाहणी करत असतानाच वाघमारे अटकेच्या भितीने तेथून पळुन निघाला होता. त्यावेळी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करणारे पोलीस उपनिरीक्षक बशीर मुलाणी यांच्या अंगावर कार घालून रोहन पसार झाला. या घटनेत मुलाणी हे किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी शुक्रवारी आणखी एक गुन्हा वाघमारेसह अन्य दोघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात
पोलिसांनी दिलेल्या तक्रारी म्हटले आहे की, रोहन याच्यावर बुधवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्यान तो तपास कामासाठी गुरुवारी पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी आला होता. त्याच दरम्यान अटक टाळणयासाठी संशयिताने शासकीय कामात अडथळा आणला. त्याचवेळी इतर दोन संशयितांनी रोहन याला चारचाकी गाडी क्र. एमएच११सीएस 00७0 या कारमधून पळवून नेले. यावेळी एका संशयितने पळवून नेण्यासाठी मदत व्हावी, म्हणून दुसरे वाहन अडवे लावण्यात आले होते. दरम्यान, मंगळवार चौकीसमोर हा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
रोहन गुरूवारी दुपारी परागंदा झाल्यानंतर तक्रारदार पोलिसाने याची रात्री उशीरा तक्रार दिली आहे. यामुळे तक्रार उशीरा दाखल करण्याचे नेमके कारण काय? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. तसेच सहा संशयित ताब्यात असताना त्यांची वैद्यकीय तपासणी कशी काय झाली नाही व अटकेची कारवाई अगोदरच काय करणार होते? असा सवालही उपस्थित झाला आहे. गुरुवारी रात्री व शुक्रवारी या प्रकरणात सातारा शहरातील अनेकांची फोनाफोनी झाल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे. सदरचे प्रकरण पुढे वाढू नये म्हणून सहकार्य मिळावे, यासाठी उठाठेव होत असल्याची चर्चा सातारा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
सेटलमेंटसाठी अनेकांची फोनाफोनी
बिल्डर रोहन बाळासाहेब वाघमारे याच्यावर एसबीआय बँकेला फसवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यासह विनोद विलास डेरे रा. कवठे ता. वाई, रणजित भोसले (पूर्ण नाव माहित नाही) अशा दोघांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कदम हे तपास करत आहेत. दरम्यान, या प्रकरणी सेटलेंटसाठी अनेकांची फोनाफोनी झाल्यामुळे आता पोलिसांच्या कारवाईकडे सातारकरांचे लक्ष लागून राहिले आहे.


