maharashtra

चाळकेवाडी पठारावर महा कश्यपी नव्या वनस्पतीची नोंद

साताऱ्याचे निसर्ग संशोधक हर्षल भोसले यांचे नवीन संशोधन

Maha Kashyapi new plant recorded on Chalkewadi plateau
साताऱ्याचे प्रसिद्ध निसर्ग संशोधक व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री मुंबई येथे सक्रिय असणारे हर्षल भोसले यांनी चाळकेवाडी पठारावर नवीन वनस्पतीच्या प्रजातीची नोंद करण्यात यश मिळवले आहे. लेपिडोगॅथस म्हणजेच महा कश्यपी अशी या वनस्पतीची नोंद करण्यात आली असून ही वनस्पती अकँथेसी या कारवीच्या कुळातील आहे. या नवीन संशोधनामुळे पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या विपुलतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

सातारा : साताऱ्याचे प्रसिद्ध निसर्ग संशोधक व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री मुंबई येथे सक्रिय असणारे हर्षल भोसले यांनी चाळकेवाडी पठारावर नवीन वनस्पतीच्या प्रजातीची नोंद करण्यात यश मिळवले आहे. लेपिडोगॅथस म्हणजेच महा कश्यपी अशी या वनस्पतीची नोंद करण्यात आली असून ही वनस्पती अकँथेसी या कारवीच्या कुळातील आहे. या नवीन संशोधनामुळे पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या विपुलतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
हर्षल भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे गेल्या अडीच वर्षापासून या वनस्पतीच्या नोंदी करता प्रयत्न सुरू होते. सामान्यत: पश्चिम घाटातील जांभा खडक आढळणाऱ्या पठारांवर ही वनस्पती मार्च-एप्रिल दरम्यान फुलांवर येते आणि शुष्क कालखंडामध्ये किटकांना पराग पुरवठा करते. अत्यंत मोहक गुलाबी रंगाची फुले या वनस्पतीत येत असून छोटी असणाऱ्या पानांच्या अग्र भागावर काटे किंवा ते टोकदार असतात. जमिनीलगत पसरून वाढणारा या वनस्पतीचा स्वभाव आहे. सद्यस्थितीत सदरची वनस्पती गुजरात ते केरळ या पश्चिम घाटामध्ये फक्त चाळकेवाडी आणि वाल्मीक पठारावर आढळून आली असून तिला प्रदेशनिष्ठ म्हणून संबोधले जाते.
निसर्गातील तिच्या अस्तित्वावर संशोधकाने तिला अतिदुर्मिळ श्रेणीत वर्गीकृत करता यावे याकरिता प्रयत्न सुरू आहेत. पश्चिम घाटात असणाऱ्या पठारावरील अनियंत्रित अवाजवी मानवी हस्तक्षेप पर्यटन तथाकथित विकास प्रकल्प आणि वनवा या समस्यांना ही वनस्पती तोंड देत आहे. संशोधकांच्या प्रयत्नामुळे सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाटाचे महत्त्व आणि त्यांच्या जैवविविधतेचे जतन करणे हे पुन्हा एकदा प्राधान्यक्रमाने सिद्ध झाले आहे. भगवान बुद्ध यांच्या शिक्षणातील आग्रह भिक्षू आकर्षण यांनी भगवान बुद्धानंतर भिक्षूंची नेतृत्व केले होते. अग्रणी राहिलेले होते ते, महाज्ञानी होते. त्या सदरची प्रजाती अर्पण करण्यात येऊन महा कश्यपी यात त्यांच्या नावाने या प्रजातीची नोंद करण्यात आली आहे. निसर्ग संशोधक मार्शल भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे या नवीन संशोधनाबद्दल अभिनंदन होत आहे.