मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील एकही आमदार नाराज नाही. उलट राष्ट्रवादीकडील काही मंडळी आमच्या संपर्कात असून, त्यांना अडविण्यासाठी जयंत पाटील असे वक्तव्य करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आजपर्यंत झाला नाही, असा प्रचंड दसरा मेळावा होईल, असा टोला उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी लगावला.
सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील एकही आमदार नाराज नाही. उलट राष्ट्रवादीकडील काही मंडळी आमच्या संपर्कात असून, त्यांना अडविण्यासाठी जयंत पाटील असे वक्तव्य करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आजपर्यंत झाला नाही, असा प्रचंड दसरा मेळावा होईल, असा टोला उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी लगावला.
शंभूराज देसाई यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. देसाई म्हणाले, एकनाथ यांच्या नेतृत्वाखालील एकही आमदार नाराज नाही. उलट राष्ट्रवादीकडील काही मंडळी आमच्या संपर्कात आहेत. त्यांना शिंदे गटात जाण्यापासून तटवून ठेवण्यासाठी जयंतराव असे वक्तव्य करत आहेत. आमदारांची मनं कळायला जयंतराव मनकवडे आहेत का, असा प्रश्न उपस्थित करून सहकार, शिक्षण क्षेत्रात त्यांचे चांगले काम आहे. वित्तमंत्री म्हणून त्यांनी चांगले काम केले आहे. कोणाच्या मनात काय आहे याचे त्यांना नवीन ज्ञान झालेले दिसत आहे. शिंदे गटाचा दसरा मेळाव्याचे जोरदार नियोजन सुरू आहे. त्यासाठी गटाचे सर्व नेत्यांवर चार-चार जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे. त्या जिल्ह्यांचे दौरे करून आम्ही वातावरण निर्मिती करत आहोत. शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आजपर्यंत झाला नाही, असा प्रचंड दसरा मेळावा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


