maharashtra

पोक्सो कायद्याअंतर्गत एकास 3 वर्षे सक्तमजुरी


3 years hard labor under Pokso Act
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास 3 वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश ए.के. पटणी यांनी सुनावली आहे.

सातारा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास 3 वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश ए.के. पटणी यांनी सुनावली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, अमोल हिंदुराव धायगुडे (वय 23, रा.शेखमिरवाडी, ता. खंडाळा, जि.सातारा) याने या घटनेतील फिर्यादी पिडीत मुलीचा वेळोवेळी विनयभंग केला होता. याबाबतची फिर्याद पिडीत मुलीने दिल्याने शिरवळ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.नोंद करण्यात आला होता.
या गुन्हयाचा तपास शिरवळ पोलीस स्टेशनच्या तत्कालीन महिला सहा.पोलीस निरीक्षक श्रीमती एस.व्ही.पाटील यांनी करून आरोपींविरूध्द यायालयांत दोषारोप पत्र दाखल केले होते. तसेच पोलीस निरीक्षक नवनाथ मदने व सहा. पोलीस उप-निरीक्षक सतीश पवार शिरवळ पोलीस स्टेशन यांनी या केसमध्ये विशेष परिश्रम घेतले. या खटल्यामध्ये एकुण 3 साक्षीदार तपासण्यात आले. केवळ परिस्थितीजन्य पुरावा व अन्य साक्षीदारांच्या साक्षीवरून हा खटला सातारचे विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश ए. के. पटणी यांच्या कोर्टात चालला होता. ऍड. नितीन मुके यांनी सरकारतर्फे खटल्याचे कामकाज पाहिले. त्यानुसार अमोल धायगुडे यास बाल लेंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 12 अन्वये 3 वर्ष सक्त मजूरी व 3 हजार रुपये दंड, दंड ने दिल्यास 2 महीने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
या खटल्यात पोलीस प्रॉसिक्युशन स्क्वॉडचे पोलीस उप-निरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे तसेच महिला सहा.पो.उप.नि. श्रीमती उर्मिला घारगे, पो.हवा. शमशुददीन शेख, सुधीर खुडे, गजानन फरांदे, महिला पो.ना. रिहाना शेख, राजेंद्र कुंभार, अश्विनी घोरपडे, पो.कॉ. अमित भरते यांनी योग्य ती मदत केली.