cineworld

विमानाच्या काचा गोलाकार का असतात काय आहे याचे कारण?


विमानात बसल्यावर तिथल्या अनेक गोष्टी आपले लक्ष वेधून घेत असतात. मात्र या सगळ्यात उत्सुकता असते ती आकाशातून पृथ्वी पाहण्याची. ते पाहत असताना विमानात खिडक्या इतर खिडक्यांपेक्षा वेगळ्या असतात हे अनेकांना जाणवले असेल. या खिडक्या चौकोनी नसून गोलाकार का असतात याबाबत अनेकांना प्रश्‍न पडतो. पण या खिडक्या गोलाकार असण्यामागेही शास्त्रीय कारण आहे.

विमानात बसल्यावर तिथल्या अनेक गोष्टी आपले लक्ष वेधून घेत असतात. मात्र या सगळ्यात उत्सुकता असते ती आकाशातून पृथ्वी पाहण्याची. ते पाहत असताना विमानात खिडक्या इतर खिडक्यांपेक्षा वेगळ्या असतात हे अनेकांना जाणवले असेल. या खिडक्या चौकोनी नसून गोलाकार का असतात याबाबत अनेकांना प्रश्‍न पडतो. पण या खिडक्या गोलाकार असण्यामागेही शास्त्रीय कारण आहे. ते काय आहे हे आपण जाणून घेऊया.
आयुष्यात किमान एकदातरी विमानप्रवास करावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. विमानात शिरताक्षणीच आपलं लक्ष वेधून घेतं ते विमानाच्या आतलं जग, थंडी भरेल अशी वातानुकूलित यंत्रणा, एकूणच भव्यता आणि हवाईसुंदर्‍या.! जागेवर स्थानापन्न झाल्यावर लक्ष सहजरित्या खिडकीबाहेर जातं. प्रवास जर पहिल्यांदाच असेल तर मात्र काय करू नि काय नको, असं होऊन जातं. पण.इतर वाहनांच्या विपरीत अशी एक गोष्ट तिथे असते, जी आपण पाहतो, पण ती अशी का? यावर कधीच विचार करत नाही, किंबहुना त्या गोष्टीचं तसं असणं हे आपण गृहीतच धरलेलं असतं; कदाचित तत्पूर्वी पाहिलेल्या विमानांच्या अनेक चित्रांमुळे असेल!
कधी आपण यावर विचार केला का की विमानाच्या खिडक्या गोलाकार का असतात? आपल्या घरातील व अगदी रेल्वेतील खिडक्या देखील चौकोनी किंवा आयताकृती असतात मग विमानाच्या गोलाकारच का? हे वाचून कदाचित आश्‍चर्य वाटेल की यामागचं मुख्य कारण म्हणजे, प्रवाशांची सुरक्षितता, आणि पर्यायाने अर्थातच, विमानाचीही! आता कोणी म्हणेल, खिडक्या चौकोनी असल्या काय किंवा गोलाकार असल्या काय, काय फरक पडतो? कारण, त्या उघडत तर नाहीच! आणि म्हणूनच, विमानातील खिडक्या गोलाकार का आहेत हा प्रश्‍न मनोरंजक आहे.गेल्या काही वर्षांमध्ये, वातवारणविषयक तंत्रज्ञानाने  मोठी झेप घेतली आहे। आता विमाने अधिक प्रवासी घेऊन आणि अधिक वेगाने जाऊ शकतात. चांगली गती मिळावी यासाठी विमानांच्या आकारात देखील सुक्ष्मसा का होईना, पण बदल होत आहे. विसाव्या शतकाच्या मध्यावर व्यावसायिक हवाई प्रवास सुरू होताच विमान कंपन्यांनी पैसे वाचवण्यासाठी अधिकाधिक उंचावर उड्डाण करण्यास सुरवात केली कारण आपण जितके अधिक उंचावर जाऊ, तितकी हवाई घनता कमी आणि विमानांना पुढे झेपावताना करावा लागणारा कमी दाबाचा सामना, ज्यामुळे कमी इंधनात अधिक दूरवरचा प्रवास! तथापि, उंचीवरच्या उड्डाणात एक समस्या होती, जसे की माणूस 30,000 फूटांवर सहजरित्या वावरू शकत नाही. श्‍वासोच्छ्वासाचे विकार उद्भवू शकतात. मग मानांच्या अंतर्गत रचनेत सुधारणा करण्याचा विचार पुढे आला. अंतर्गत दाबांमुळे होणारा प्रतिरोध कमी करण्यासाठी केबिनला दंडगोलाकार आकारात बदलले गेले. मात्र असे करताना खिडक्या चौकोनीच ठेवल्या गेल्या. डी हॅव्हिलंड डी एच 106 कॉमेट हे 1950 च्या दशकात वापरात आलेलं पहिलं जेट विमान, जे व्यापारी तत्वावर चालवलं गेलं. ब्रिटिश एअरवेजच्या ताफ्यात ही विमाने होती. वायुगतीशास्त्रीय शास्त्रानुसार बनवलेले हे विमान इतर विमानांपेक्षा उंचावर आणि जलदगतीने उडण्यात सक्षम होते. तथापि, या विमानाला चौरस खिडक्या होत्या. पण 1953 मध्ये एकापाठोपाठ अशी तीन विमाने हवेत असताना पडली आणि एकूण 43 लोक ठार झाले. कसलाही अपघात न होता ही विमाने का पडली असावी यावर संशोधन केले गेले आणि जे उत्तर सापडलं, ते जगावेगळं होतं!  होय, एक खिडकी बसविण्यासाठी लांबलचक पोलादी पत्र्याला जी चौकोनी पोकळी निर्माण केली गेली, तीच याला जबाबदार होती. कारण, चौकोनी खिडकी म्हणजे चार कोपरे, अशा अनेक खिडक्या. हे कोपरे, जिथे काचेला आधार देण्यासाठी चार पोलादी पट्ट्या एकमेकांना जोडून फ्रेम केली जात असे, ती विमानाच्या बाहेरच्या भागाची सर्वात कमकुवत बाजू असे. हवेचा प्रचंड दाब क्षणाक्षणाला त्या कोपर्‍यांवर पडून ते कमकुवत झाले की त्या पट्ट्या निखळून पडून हवा प्रचंड वेगाने विमानात शिरत असे व त्यामुळेच ते विमानांचे जमीनदोस्त होणे.सुदैवाने, डिझाइनर्सना संरचनेमधील ही त्रुटी खूप लवकर लक्षात आली. आणि एक नवी खिडकी जन्माला आली, गोलाकार, जिची काचेला आधार देणारी पट्टी एकसंध होती, हवा आत शिरण्यास फार फार तर एकच कोपरा होता. तर, ही होती विमानाच्या गोलाकार खिडक्यांच्या जन्माची कथा.