आयटक सलग्नित महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनचे दिनांक 18 व 19 नोव्हेंबर रोजी न्यू इंग्लिश स्कूल येथे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
शासनाचे काम जनतेपर्यंत आणि जनतेच्या भावना शासनापर्यंत पोहचवणारा दुवा म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे काम महत्त्वपूर्ण ठरणारे आहे. शासन योजनांच्या अधिक व्यापक आणि गतिमान प्रसिद्धीचे काम संघटितपणे करण्याचे आवाहन नवनियुक्त माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज यांनी आज येथे केले.
र्यावरण पूरक कृषी व औद्योगिक समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी श्रमिक मुक्ती दलाचा दि.15 सप्टेंबर रोजी कराड येथील पलाश मंगल कार्यालयामध्ये वार्षिक महामेळावा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 72 वी वार्षिक साधारण सभा शनिवार दि. 20 रोजी खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 72 वी वार्षिक साधारण सभा शनिवार दिनांक 20 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 1.00 वाजता बँकेचे मुख्य कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत येथील यशवंतराव चव्हाण सभागृहांत होणार आहे.
माढा लोकसभा मतदारसंघाचे पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विश्वासू सहकारी जयकुमार शिंदे यांची भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडीने होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला चांगलाच फायदा होणार आहे.
सातारा जिल्हा कृषी कर्मचारी सहकारी पतसंस्थेची ५१ वी वार्षिक साधारण सभा रविवार दि. १९ रोजी खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
सत्ताधारी सातारा विकास आघाडीच्या सभासदांचा कार्यकाल संपून आता 28 दिवस उलटले. प्रशासक व मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सर्वसाधारण सभेचे अजेंड्यावर साठ विषय ठेवण्यात आले आहेत. ही सभा 24 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता कमिटी हॉल येथे होणार आहे. सातारा पालिकेच्या इतिहासात सातारा पालिकेची अंदाजपत्रकीय सभा आणि सर्वसाधारण सभा प्रथमच प्रशासक असताना होणार आहे.
जनरल बिपिन रावत यांनी भारताच्या संरक्षण दलामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणला. ते भारतीय लष्कराचे २६ वे लष्करप्रमुख होते. महाराष्ट्राचा आणि त्यांचा फार जिव्हाळ्याचा संबंध होता. त्यांच्या निधनाने देशाची फार मोठी हानी झाली असून त्यांचे कार्य देश कायम स्मरणात ठेवेल, असे मत सदगुरु गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी व्यक्त केले.
सर्व नियम सर्वसामान्य जनतेसच का? अशा प्रश्न नागरिकांना पडला असून शहरामध्ये पार्किंगची सुविधा नाहीत पण नो - पार्किंग मधील वाहने उचलणेसाठी टोविंग व्हॅन आहेत. जेथे पॅर्जिंगचे आरक्षण आहे तिथे धनदांडगे, राजकारणी लोकांनी अनौपचारिक ताबा मारला असलेमुळे तिथे वाहने पार्किंग होऊ शकत नाही परिणामी सदरची वाहने जागा मिळेल तिथे पार्क होतात
गेल्या तीन महिन्यापासून सर्वसाधारण सभा न झाल्याने सर्वसामान्यांची विकास कामे खोळंबून पडली आहेत. लोकांचे प्रश्न सोडवायचे नाही तर खुर्चीत बसायचे कशाला ? असा सणसणीत सवाल नगर विकास आघाडीने निवेदनाद्वारे विचारला आहे. लवकरात लवकर सर्वसाधारण सभा न निघाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला असून नगरविकास आघाडीने हे निवेदन बुधवारी जिल्हा प्रशासनाला सादर केले.
नाशिक पोलीस आयुक्त व अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून राज्यातील अति महत्वाच्या पदावर कामकाजाचा ठसा उमटवणाऱ्या प्रकाश पवार यांचा अतिशय शिस्तप्रिय व जबाबदार अधिकारी म्हणून महाराष्ट्रामध्ये नावलौकीक होता. त्यांनी पोलीस अधीक्षक म्हणून सोलापूर, अहमदनगर, रायगड, पुणे ग्रामीण येथे विशेष काम केले आहे.
मारुती सुझुकीतील व्यावसायिक वाहनांच्या ग्राहकांसाठीचा विभाग आपल्या 235 हून अधिक शहरांमधील 325 हून अधिक आऊटलेट्ससह सर्वाधिक वेगाने वाढणारे ऑटोमोबाइल नेटवर्क ठरला आहे.
विमानात बसल्यावर तिथल्या अनेक गोष्टी आपले लक्ष वेधून घेत असतात. मात्र या सगळ्यात उत्सुकता असते ती आकाशातून पृथ्वी पाहण्याची. ते पाहत असताना विमानात खिडक्या इतर खिडक्यांपेक्षा वेगळ्या असतात हे अनेकांना जाणवले असेल. या खिडक्या चौकोनी नसून गोलाकार का असतात याबाबत अनेकांना प्रश्न पडतो. पण या खिडक्या गोलाकार असण्यामागेही शास्त्रीय कारण आहे.