पाडळी, तालुका सातारा येथे घरफोडी करून अज्ञात चोरट्याने सुमारे 73 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : पाडळी, तालुका सातारा येथे घरफोडी करून अज्ञात चोरट्याने सुमारे 73 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान पाडळी, ता. सातारा येथील शंकर दिलीप ढाणे यांच्या राहत्या घराच्या दरवाज्याचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून घरातील कपाटातील लॉकर तोडून लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे साडे अठ्ठावीस ग्रॅम वजनाचे दागिने आणि चांदीचे दागिने असा एकूण 72 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबतची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक निकम करीत आहेत.


