दिवाळी सणानिमित्त खरेदी होणाऱ्या नवीन वाहनांना पसंती नोंदणी क्रमांक मिळुन जनतेला वाहनाचा ताबा मिळावा या करिता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा रविवार दि. 23 ऑक्टोबर या सार्वजनिक सुट्टी दिवशी सुरु ठेवण्यात येणार आहे.
सातारा : दिवाळी सणानिमित्त खरेदी होणाऱ्या नवीन वाहनांना पसंती नोंदणी क्रमांक मिळुन जनतेला वाहनाचा ताबा मिळावा या करिता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा रविवार दि. 23 ऑक्टोबर या सार्वजनिक सुट्टी दिवशी सुरु ठेवण्यात येणार आहे.
या दिवशी नवीन वाहन नोंदणी व कर वसुलीचे कामकाज सुरु राहील. तरी वाहन वितरक व वाहन धारक यांनी याचा लाभ घ्यावा, असे अवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा यांनी केले आहे.


