maharashtra

सातारा पालिकेतील अनुकंपा नियुक्‍तीबाबत आयुक्तांना निवेदन


Statement to the Commissioner regarding compassionate appointment in Satara Municipality
पालिकेत काम करत असताना कर्तव्‍यावर, तसेच इतर कामांदरम्‍यान मृत झालेल्‍या कर्मचाऱ्यांच्‍या वारसांना नोकरीत सामावून घेण्‍याची कार्यवाही १९९७ पासून झालेली नाही. ही प्रक्रिया पूर्ण न झाल्‍याने अनेक मृत कर्मचाऱ्यांच्‍या वारसांना वयो मर्यादेचा सामना करावा लागत आहे.

सातारा : सातारा पालिकेतील मृत कर्मचाऱ्यांच्‍या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीत सामावून घेण्‍याच्या मागणीचे निवेदन रिपब्‍लिकन एम्‍प्‍लॉईज फेडरेशनच्‍या वतीने गणेश दुबळे यांनी पुणे विभागीय आयुक्‍तांना आज दिले.
पालिकेत काम करत असताना कर्तव्‍यावर, तसेच इतर कामांदरम्‍यान मृत झालेल्‍या कर्मचाऱ्यांच्‍या वारसांना नोकरीत सामावून घेण्‍याची कार्यवाही १९९७ पासून झालेली नाही. ही प्रक्रिया पूर्ण न झाल्‍याने अनेक मृत कर्मचाऱ्यांच्‍या वारसांना वयो मर्यादेचा सामना करावा लागत आहे. यामुळे अनुकंपा तत्त्वावरील नियुक्‍त्‍यांच्‍या कार्यवाही तत्काळ पूर्ण करण्‍याची मागणी दुबळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनानुसार अनुकंपावरील नियुक्‍त्‍यांची कार्यवाही तत्‍काळ करण्‍यासाठीचे आदेश पालिका प्रशासनास देण्‍याचे आश्‍‍वासन या वेळी विभागीय आयुक्‍तांनी दिल्‍याची माहिती दुबळे यांनी दिली आहे.