maharashtra

कराडात युवकावर धारदार शस्त्राने वार


In Karad, a youth was attacked with a sharp weapon
शहरातील दत्त चौक परिसरात एका युवकावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या भांडणाचा राग मनात शनिवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये संबंधित युवक जखमी झाला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

कराड : शहरातील दत्त चौक परिसरात एका युवकावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या भांडणाचा राग मनात शनिवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये संबंधित युवक जखमी झाला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, शुक्रवारी २४ रोजी रात्री किरकोळ कारणावरून जखमी युवक व वार करणार्‍या युवकामध्ये वादावादी झाली होती. याचाच राग मनात धरून शनिवारी २५ रोजी जखमी युवक दत्त चौक परिसरातील एका चहाच्या दुकानाजवळ उभा असताना त्याच्यावर चाकूसारख्या धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये युवक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात  हलविण्यात आले आहे. याबाबतची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात झाली नव्हती.