शिवीगाळ, दमदाटी करून पैशाची मागणी केल्याप्रकरणी एकावर सावकारी अंतर्गत शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : शिवीगाळ, दमदाटी करून पैशाची मागणी केल्याप्रकरणी एकावर सावकारी अंतर्गत शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, २०१७ साली रुपल राजेंद्र राजेशिर्के, रा. मंगळवार पेठ, सातारा यांचे पती आजारी पडल्याने त्यांना पैशाची गरज होती. त्यामुळे त्यांनी अंजुमन मुसा शेख, रा. न्यू इंग्लिश स्कूल जवळ, सातारा यांच्याकडून काही रक्कम ५ टक्के व्याजाने घेतली होती. ती रक्कम परत देऊनही शेख यांनी त्यांना शिवीगाळ, दमदाटी करून पैशाची मागणी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


