crimeagainstoneinlendingcase

esahas.com

सावकारी प्रकरणी एकावर गुन्हा

शिवीगाळ, दमदाटी करून पैशाची मागणी केल्याप्रकरणी एकावर सावकारी अंतर्गत शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

सावकारीप्रकरणी एकावर गुन्हा

मुलीच्या लग्नाकरता ४0 हजार रुपयांची गरज असल्याने फिर्यादीने चार महिन्याच्या मुदतीकरता मालगाव येथील एकाकडून १0 टक्के दराने पैसे घेतले. त्याचे ५५ हजार रुपये दिले. दरम्यान, फिर्यादीकडून आधारकार्ड झेरॉक्स, स्टेट बँकेचे दोन कोरे चेक घेतले ते पैसे पूर्ण देवूनही अद्यापपर्यंत परत दिले नाहीत.