maharashtra

विरोधकांचे टँकरने पाणी वाटप निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच

नविआचे माजी पक्षप्रतोद अविनाश कदम यांची टीका

व्यंकटपुरा पेठ व मोरे कॉलनी येथे विरोधकांनी टॅंकरने सुरू केलेले पाणीवाटप हे हेतूपूर्वक असून निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच त्यांचे हे उद्योग सुरू झाले आहेत. महादरे तलावाकडे आणि त्याच्या वॉल्वकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करा, अशी मागणी नगर विकास आघाडीचे माजी पक्षप्रतोद अविनाश कदम यांनी केली आहे.

सातारा : व्यंकटपुरा पेठ व मोरे कॉलनी येथे विरोधकांनी टॅंकरने सुरू केलेले पाणीवाटप हे हेतूपूर्वक असून निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच त्यांचे हे उद्योग सुरू झाले आहेत. महादरे तलावाकडे आणि त्याच्या वॉल्वकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करा, अशी मागणी नगर विकास आघाडीचे माजी पक्षप्रतोद अविनाश कदम यांनी केली आहे.
महादरे तलावाच्या कृत्रिम पाणीटंचाईच्या प्रकरणावर सातारा विकास आघाडीचे माजी नगरसेवक वसंत लेवे व नगर विकास आघाडीचे माजी पक्षप्रतोद अविनाश कदम यांच्यात जोरदार राजकीय कलगीतुरा सुरू आहे.
या संदर्भात अविनाश कदम यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, विरोधक निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच टँकरचे पाणी वाटप करत आहेत. जे टँकर इतरत्र शौचालयांना पाणीपुरवठा करतात तेच टँकर आणि मोरे कॉलनी परिसरामध्ये पाणी वाटपाला येतात, हे येथील नागरिकांना चांगलेच ठाऊक आहे. यांनी महादरे तलावात गाळ काढण्यासाठी जेसीबी उतरवला. त्यामुळे तेथील दगडी संरचनेला तडे गेल्याने त्यातूनच पाणी झिरपून वाहून गेल्याची शक्यता आहे. गेल्या डिसेंबर पर्यंत पाऊस झाल्याने ते पाणी जूनपर्यंत पुरले होते. मात्र यंदा गळतीचे खरे कारण यांची चुकीची गाळ काढण्याच्या पद्धतीमुळेच हे प्रकरण घडले आहे.
ज्या कर्मचाऱ्याने पाणी वाहून गेल्याची तक्रार केली, त्या कर्मचाऱ्यांचे वॉल्व फिरवण्याच्या प्रकरणाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्याला पहिले निलंबित करायला हवे, अशी मागणी त्यांनी केली. महादरे तलावाच्या तळ रचनेला संपूर्णपणे काँक्रीट करण्यात यावे, अशी मागणी आम्ही अभिजीत बापट यांच्याकडे केली असल्याचे अविनाश कदम यांनी सांगितले.