सातारा तालुक्यातील बसापाचीवाडी व दहिवड येथे विविध दोन घटनेत दोघांचा मृत्यू झाला. या घटना 15 ऑक्टोबर रोजी समोर आल्या असून सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदी झाल्या आहेत.
सातारा : सातारा तालुक्यातील बसापाचीवाडी व दहिवड येथे विविध दोन घटनेत दोघांचा मृत्यू झाला. या घटना 15 ऑक्टोबर रोजी समोर आल्या असून सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदी झाल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पंकज वसंतराव नलवडे (वय 47, रा. वाढे ता.सातारा) यांचा मृतदेह बसापाचीवाडी गावच्या हद्दीतील कण्हेर डावा कालव्यात आढळला. प्राथमिक माहितीनुसार ते मुंगळमाळ नावच्या शेतात काम करण्यासाठी गेले होते. मात्र ते परत आले नाहीत. त्यांचा शोध घेतला असता ते सापडले नाहीत. दि. 15 रोजी कॅनॉलमध्ये मृतदेह आढळून आला. पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दुसर्या घटनेत चंद्रकांत श्रीपती वाईकर (वय 75, रा. दहिवड) यांचा बुडून मृत्यू झाला आहे. उरमोडी बुडीत पाणलोटाच्या क्षेत्रात असलेल्या विहीरीच्या पाण्यात त्यांचा मृतदेह आढळुन आला. याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव देवून पाहणी केली. दरम्यान, दोन्ही घटनांची नोंद पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


