नागालँड विधानसभा निवडणुकीत रिपाईच्या दोन उमेदवारांनी विजय मिळवला. या विजयानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने सातारा येथे शुक्रवारी फटाक्यांची आतिषबाजी व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
सातारा : नागालँड विधानसभा निवडणुकीत रिपाईच्या दोन उमेदवारांनी विजय मिळवला. या विजयानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने सातारा येथे शुक्रवारी फटाक्यांची आतिषबाजी व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे दोन उमेदवार नागालँडच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. रिपाईचा थेट महाराष्ट्र बाहेर डंका वाजल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शुक्रवारी सातारा रिपाइंच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर ये-जा करणाऱ्या नागरिक व वाहनचालकांना पेढे वाटून आनंदोत्सव करण्यात आला.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो अशा घोषणा देखील देण्यात आल्या. यावेळी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, अण्णा वायदंडे, आप्पा तुपे यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


