maharashtra

धूम स्टाईलने मंगळसुत्र हिसकवल्याची दुसरी घटना

महिलांमध्ये भीतीचे वातावरण : चोरटय़ांना जेरबंद करण्याची मागणी

इस्माईल मुल्ला लॉ कॉलेज समोरून पायी चालत निघालेल्या महिलेचे मंगळसुत्र धूम स्टाईलने दोन इसमांनी चोरून पसार झाले. ही दोन दिवसांतील ही दुसरी घटना आहे. अशीच घटना पिरवाडी परिसरात घडली. यामुळे महिलांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरटय़ांना जेरबंद करण्याची मागणी जोर धरत आहे.

सातारा : इस्माईल मुल्ला लॉ कॉलेज समोरून पायी चालत निघालेल्या महिलेचे मंगळसुत्र धूम स्टाईलने दोन इसमांनी चोरून पसार झाले. ही दोन दिवसांतील ही दुसरी घटना आहे. अशीच घटना पिरवाडी परिसरात घडली. यामुळे महिलांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरटय़ांना जेरबंद करण्याची मागणी जोर धरत आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पद्मीनी मनोहर चव्हाण (वय 47, रा. शनिवार पेठ सातारा) या गुरूवार दि. 15 रोजी सकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेज समोरून पायी चालत निघाल्या होत्या. यावेळी पाठीमागून दोन इसम मोटार सायकलवरून आले. त्यांनी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले आणि पसार झाले. महिलनेने आरडाओरडा केला. परंतु त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. यामुळे त्यांनी शहर पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करत आहेत.