anotherinstanceofdhoomstylesnatchingofmangalsutra

esahas.com

धूम स्टाईलने मंगळसुत्र हिसकवल्याची दुसरी घटना

इस्माईल मुल्ला लॉ कॉलेज समोरून पायी चालत निघालेल्या महिलेचे मंगळसुत्र धूम स्टाईलने दोन इसमांनी चोरून पसार झाले. ही दोन दिवसांतील ही दुसरी घटना आहे. अशीच घटना पिरवाडी परिसरात घडली. यामुळे महिलांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरटय़ांना जेरबंद करण्याची मागणी जोर धरत आहे.