‘दत्त इंडीया’च्या डिस्टिलरी मधील पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
साखरवाडी ग्रामपंचायत, प्रदूषण विभागाकडे तक्रारी करूनही कारवाई शून्य
साखरवाडी ता. फलटण येथील दत्त इंडीया प्रा. लिमिटेड यांनी त्यांचे डिस्टिलरी चे दूषित पाणी अचानक पणे प्रचंड प्रमाणात साखरवाडी येथील ओढ्यात सोडले आहे. त्यामुळे पिंपळवाडी, भोसले वस्ती, काटकर वस्ती, रूपनवर वस्ती, तांबे वस्ती, जोशी वस्ती व या परिसरातील सर्वच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून जनावरांच्या पाण्याचा प्रश्न ही गंभीर बनला आहे.
फलटण : साखरवाडी ता. फलटण येथील दत्त इंडीया प्रा. लिमिटेड यांनी त्यांचे डिस्टिलरी चे दूषित पाणी अचानक पणे प्रचंड प्रमाणात साखरवाडी येथील ओढ्यात सोडले आहे. त्यामुळे पिंपळवाडी, भोसले वस्ती, काटकर वस्ती, रूपनवर वस्ती, तांबे वस्ती, जोशी वस्ती व या परिसरातील सर्वच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून जनावरांच्या पाण्याचा प्रश्न ही गंभीर बनला आहे. या परिसरातील सर्व महीला भगिनींचीही धुणी धुण्याची खुप मोठी अडचण निर्माण झाली आहे.
एकंदरीत पाहता दत्त इंडीया प्रा. लि. या कंपनीच्या डिस्टिलरी मुळे व यामधुन सतत ओढ्यात सोडले जाणारे प्रदूषित पाणी, उग्र वास, बॅायलर मधून प्रचंड प्रमाणात उडणारी काजळी, परिसरातील सर्व रस्त्यावर सतत साचणारा बगॅज चा खच या सर्व बाबींमुळे साखरवाडी परिसरातील सर्व नागरिक, सर्व शाळांमधील विद्यार्थी, प्रा.आरोग्य केंद्रात उपचार घेत असलेले रुग्ण या सर्वांचेच आरोग्य धोक्यात आले आहे आणि परस्थिती खुपच गंभीर बनत चालली आहे.
याबाबतीत प्रदूषण विभागाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही कसलीही कारवाई होत नाही. यामागचे नक्की गौडबंगाल काय आहे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे.
साखरवाडी ग्रामपंचायतही याबाबतीत काहीही कारवाई का करत नाही. हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. ग्राम पंचायतीने या डिस्टिलरी साठी ना-हरकत दाखला दिला आहे काय? दिला असल्यास त्यामधील शर्ती काय आहेत? आणि ना-हरकत दाखला दिला नसेल तर त्याशिवाय डिस्टिलरी चालू झालीच कशी? या सर्व बाबतीत ग्रामपंचायतीने नागरिकांना योग्य तो खुलासा करून आपली भुमिका स्पष्ट करून या प्रदूषणा बाबतीत कठोर कारवाई करून सर्व सामान्य नागरिकांना त्वरीत न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा या परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.
तसेच दत्त इंडिया च्या सर्वच प्रकल्पांना काहीही न पाहता ना-हरकत पत्र द्यावे अशी ग्रामसभा, व अन्य मार्गाने आंदोलने करणार्या साखरवाडीतील पुढारी, नेत्यांनी सुद्धा याबाबतीत आपली भूमिका जनतेसमोर मांडावी, हीच अपेक्षा येथील प्रदूषणत्रस्त नागरीक व्यक्त करीत आहेत.


