राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी खा. छ. उदयनराजे भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सुमारे अर्धा तास खा. उदयनराजे व आ. जयंत पाटील यांच्यात खलबते झाली. त्यानंतर जयंत पाटील यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका खा. उदयनराजेंना देत निरोप घेतला.
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी खा. छ. उदयनराजे भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सुमारे अर्धा तास खा. उदयनराजे व आ. जयंत पाटील यांच्यात खलबते झाली. त्यानंतर जयंत पाटील यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका खा. उदयनराजेंना देत निरोप घेतला.
सोमवारी सायंकाळी 7 च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी जलमंदिर पॅलेस येथे खा. उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. अचानक झालेल्या या भेटीमागे आ. जयंत पाटील यांच्या मुलाच्या लग्नाच्या निमंत्रणाचे कारण असल्याचे सांगण्यात आले. सुमारे अर्धा तास या दोघांमध्ये खलबते झाली. या भेटीत लग्न निमंत्रणासह विविध विषयांवर चर्चाही करण्यात आली. आ. जयंत पाटील हे जलमंदिरवर आल्याचे समजताच राजकीय चर्चांना जिल्ह्यात ऊत आला.
आ. जयंत पाटील यांचे खा. उदयनराजे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, काका धुमाळ, जितेंद्र खानविलकर, रॉबर्ट मोझेस उपस्थित होते.


