सातारा शहरातील शुक्रवार पेठ येथील एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे चंद्रशेखर केशवराव यादव उर्फ शेखर यादव (७१) यांचे काल दुपारी प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले.
सातारा : सातारा शहरातील शुक्रवार पेठ येथील एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे चंद्रशेखर केशवराव यादव उर्फ शेखर यादव (७१) यांचे काल दुपारी प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले.
त्यांच्या मागे दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर काल सायंकाळी संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
सातारा शहरात मोबाईल व्हॅन मधून स्नॅक्स (नाष्ट्याचे पदार्थ) देण्याची खऱ्या अर्थाने सुरुवात शेखर यादवने केली होती. नवनवीन कल्पनांचा आविष्कार शेखरकडे होता. त्याने अनेक मित्र जमवले होते.


