कठापुर, ता. कोरेगाव गावच्या हद्दीत गोगावलेवाडी ते कठापुर जाणाऱ्या मार्गावर वाळू वाहतूक करणाऱ्या रोहन दिलीप पवार, रा. भैरोबा गल्ली, रहिमतपुर, ता. कोरेगाव याला रहिमतपुर पोलिसांनी अटक केली असुन त्याच्याकडून ट्रक, वाळुसह १५ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सातारा : कठापुर, ता. कोरेगाव गावच्या हद्दीत गोगावलेवाडी ते कठापुर जाणाऱ्या मार्गावर वाळू वाहतूक करणाऱ्या रोहन दिलीप पवार, रा. भैरोबा गल्ली, रहिमतपुर, ता. कोरेगाव याला रहिमतपुर पोलिसांनी अटक केली असुन त्याच्याकडून ट्रक, वाळुसह १५ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १७ एप्रिल रोजी ४.३० वाजण्याच्या सुमारास कटपुर गावच्या हद्दीत गोगावले ते कठापुर जाणाऱ्या मार्गावर रोहन दिलीप पवार हा शासनाची कोणतीही परवानगी न घेता ट्रकमधुन १५ हजार रुपये किमतीची तीन ब्रास वाळु चोरून नेताना आढळून आला त्याच्याकडून वाळुसह, ट्रक असा एकूण १५ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी रोहन पवार याला अटक करण्यात आली आहे.


