trucksandandothervaluablesworthrs15lakhseizedfromkathapur

esahas.com

कठापुर येथून ट्रक, वाळुसह १५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

कठापुर, ता. कोरेगाव गावच्या हद्दीत गोगावलेवाडी ते कठापुर जाणाऱ्या मार्गावर वाळू वाहतूक करणाऱ्या रोहन दिलीप पवार, रा. भैरोबा गल्ली, रहिमतपुर, ता. कोरेगाव याला रहिमतपुर पोलिसांनी अटक केली असुन त्याच्याकडून ट्रक, वाळुसह १५ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.