सातारा शहरातील शनिवार पेठेतील बंद घर फोडून अज्ञाताने सुमारे 8 हजारांचे घरगुती साहित्य चोरून नेले आहे. घटनेतील अज्ञात चोरट्याविरूद्ध चंद्रशेखर कुलकर्णी (वय 64) यांनी शाहुपरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : सातारा शहरातील शनिवार पेठेतील बंद घर फोडून अज्ञाताने सुमारे 8 हजारांचे घरगुती साहित्य चोरून नेले आहे. घटनेतील अज्ञात चोरट्याविरूद्ध चंद्रशेखर कुलकर्णी (वय 64) यांनी शाहुपरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चंद्रशेखर कुलकर्णी हे शनिवार पेठेत राहत आहेत. गेल्या काही दिवसापासून ते बाहेरगावी गेले होते. यामुळे घर बंद हेते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराच्या भिंतीला भगदाड पाडून घरात प्रवेश केला. यावेळी घरात ठेवलेली पितळी भांडी, गॅस सिलेंडर, ऍल्युमिनियमची पातेली असे एकूण 8 हजार 270 रूपये किंमतीचे घरगुती साहित्य चोरून नेले. या चोरीची माहिती मिळताच चंद्रशेखर कुलकर्णी यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार डमकले करत आहेत.


