materialworth8thousandwasstolen

esahas.com

घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीला  

सातारा शहरातील शनिवार पेठेतील बंद घर फोडून अज्ञाताने सुमारे 8 हजारांचे घरगुती साहित्य चोरून नेले आहे. घटनेतील अज्ञात चोरट्याविरूद्ध चंद्रशेखर कुलकर्णी (वय 64) यांनी शाहुपरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.