वेण्णा नदीपात्रात एक बेवारस मृतदेह आढळून आल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : वेण्णा नदीपात्रात एक बेवारस मृतदेह आढळून आल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक पाच ऑक्टोबर रोजी अकरा वाजण्याच्या दरम्यान वाढे, ता. सातारा गावच्या हद्दीत वेण्णा नदीच्या पात्रात अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबतची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सपोनि चौधरी अधिक तपास करीत आहेत.


