केंजळ, तालुका वाई चांदक रस्त्यावरील हेळणा नावाच्या शिवारातील दवाखान्यातून अज्ञात चोरट्याने दहा हजार आठशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
सातारा : केंजळ, तालुका वाई चांदक रस्त्यावरील हेळणा नावाच्या शिवारातील दवाखान्यातून अज्ञात चोरट्याने दहा हजार आठशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
याप्रकरणी प्रवीण गेणबा वाघमारे वय 41 पशुवैद्यकीय अधिकारी राहणार केंद्र तालुका वाई यांनी भुईंज पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. हा चोरीचा प्रकार 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणे पाचच्या दरम्यान घडला आहे. चोरट्याने हेळणा नावाच्या शिवारातील दवाखान्याच्या पाठीमागून आत प्रवेश करून या साहित्याची चोरी केली. पोलीस हवालदार देशमुख अधिक तपास करत आहेत.


