येथील जिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका वाहनतळावर असलेला पाच हजार रुपये किमतीचा ऑक्सीजन सिलेंडर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : येथील जिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका वाहनतळावर असलेला पाच हजार रुपये किमतीचा ऑक्सीजन सिलेंडर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १२ ते १६ एप्रिल दरम्यान सातारा जिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका वाहन तळावरील पाच हजार रुपये किमतीचा पाच किलो वजनाचा ऑक्सीजन सिलेंडर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार संदीपकुमार भिवा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.


