maharashtra

8 लाख 20 हजारांची फसवणूक करणार्‍या भामट्याला अटक

न्यायालयाने दिली 3 दिवसांची पोलिस कोठडी

8 lakh 20 thousand swindler arrested
ट्रस्ट मार्फत दीड कोटी रुपयांचे लोन मिळवून देतो, असे सांगून त्याबदल्यात 8 लाख 20 हजार रुपये घेवून फसवणूक करणार्‍या भामट्याला सातारा पोलिसांनी अटक केली. नारायण मारुती चौधरी (वय 52, रा. लोअर परेल, मुंबई) असे त्याचे नाव असून त्याला न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.

सातारा : ट्रस्ट मार्फत दीड कोटी रुपयांचे लोन मिळवून देतो, असे सांगून त्याबदल्यात 8 लाख 20 हजार रुपये घेवून फसवणूक करणार्‍या भामट्याला सातारा पोलिसांनी अटक केली. नारायण मारुती चौधरी (वय 52, रा. लोअर परेल, मुंबई) असे त्याचे नाव असून त्याला न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने शहर पोलिस ठाण्यात 17 नोव्हेबर 2018 रोजी धाव घेतली. त्याने तिघांविरुध्द फसवणूकीची तक्रारही दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांनी दोघांना अटक केली. मात्र तिसरा मुख्य संशयित नारायण चौधरी पसार झाला होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र तो पोलिसांना गुंगारा देत होता.
सातारा पोलिसांचा तपास सुरु असताना तपासी अधिकारी चेतन मछले यांना संशयिताची माहिती मिळताच त्यांनी पोलिस हवालदार अब्दुल खलिफा, निलेश निकम, गणेश घाडगे यांचे पथक तयार करुन मुंबईतून संशयित आरोपीला अटक केली. न्यायालयासमोर संशयिताला हजर केले असता 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.