तीन वर्षापासून फरार असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील संशयित दऱ्या खटपट्या भोसले, रा.मालगाव, ता. सातारा याला स्थानिक गुन्हे शाखेने जांब, ता. वाई येथून अटक केली.
सातारा : तीन वर्षापासून फरार असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील संशयित दऱ्या खटपट्या भोसले, रा.मालगाव, ता. सातारा याला स्थानिक गुन्हे शाखेने जांब, ता. वाई येथून अटक केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २६ डिसेंबर २०२२ ते दि. ९ जानेवारी २०२३ पर्यंत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी जिल्ह्यातील गुन्ह्यात हवे असलेले फरारी संशयित पकडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिले होते. त्यानुसार पथक संशयितांचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना माहिती मिळाली, खुनाच्या गुन्ह्यातील तीन वर्षापासून फरार असलेला दऱ्या खटपट्या भोसले हा जांब, ता. वाई येथे येणार आहे. त्या ठिकाणी पथकाने त्याचा शोध घेतला असता तो निदर्शनास आला मात्र पोलिसांना पाहून तो पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्याला पाठलाग करून पकडले. त्याला अटक करण्यात आली असून दऱ्या खटपट्या भोसले असे त्याचे नाव आहे. त्याला कोरेगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, संतोष पवार, विश्वनाथ संकपाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, गणेश कापरे, विशाल पवार, मोहन पवार, रोहित निकम, सचिन ससाने, पृथ्वीराज जाधव यांनी सहभाग घेतला.


