maharashtra

कर्जाच्या आमिषाने वैद्यकीय व्यावसायिकाला सुमारे 35 लाखांचा गंडा


कर्जाच्या आमिषाने साताऱ्यातील एका वैद्यकीय व्यावसायिकाला सुमारे 35 लाखांचा गंडा घातल्या प्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : कर्जाच्या आमिषाने साताऱ्यातील एका वैद्यकीय व्यावसायिकाला सुमारे 35 लाखांचा गंडा घातल्या प्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 9 जून 2019 ते 31 जुलै 2021 दरम्यान साताऱ्यातील वैद्यकीय व्यावसायिकाला मनीष अशोक अग्रवाल राहणार प्रतीक नगर, पुणे याने सिटीस्कॅन मशीन साठी लोन मिळवून देतो, असे सांगून कर्ज प्रकरणाकरता वेळोवेळी काहीतरी कारणे सांगून खडतरे व्यावसायिकाकडून कर्ज प्रकरण व विमानाच्या तिकिटाकरता 35 लाख 2 हजार 670 रुपये घेऊन व्यावसायिकाला बनावट डीडी व लोन एग्रीमेंट देऊन व्यावसायिकाची फसवणूक केली आहे. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस. बी. मोरे करीत आहेत.