मला फॉरेन फंडातून भरपूर पैसे मिळणार आहेत. तुम्हाला 100 कोटीचे कर्ज कमी व्याजदरात देतो, असे सांगून वेळोवेळी 40 लाख रुपये घेवून संदीप बाळू घोरपडे (रा. टाकेवाडी ता.माण) याने सातार्यातील एका डॉक्टरला गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. 15 दिवसातील अशी दुसरा घटना असून शाहूपुरी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
कर्जाच्या आमिषाने साताऱ्यातील एका वैद्यकीय व्यावसायिकाला सुमारे 35 लाखांचा गंडा घातल्या प्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कमी व्याजदराने कर्ज देतो, असे आमिष दाखवून सुमारे पाच जणांची फसवणूक केल्या प्रकरणी कोमल भिसे, अनिता पाटील उर्फ राणी गालफाडे या दोघींना सातारा शहर पोलिसांनी अटक केली. संशयित दोन्ही महिलांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी मिळाली आहे.
तीन लाख रुपयांच्या कर्जाच्या आमिषाने १ लाख ६९ हजार रुपयांच्या फसवणूक प्रकरणी एकावर रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!